welcome

ज्ञानगंगा संकेतस्थळास भेट देणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत..!

welcome

WELCOME

Saturday, June 20, 2020

आंतरराष्ट्रीय योग दिन मार्गदर्शक पुस्तिका


योगाचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगभरात आता योगाचे धडे दिले जात आहेत. याचाच परिपाक म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून जगभर साजरा केला जात आहे. योगाच्या प्रचारामुळे योगा करणे सोपे आहे व त्याने रोग निवारण होऊ शकते, हे सामान्य माणसाच्या लक्षात येऊ लागले आहे. आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या काही योगासनांची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

योग ही जीवन जगण्याची कला आहे. त्यामुळे आत्मविश्वास तर वाढेल व आत्महत्या व नैराश्याचे प्रमाण कमी होईल. आपल्याला निरोगी आयुष्य तर लाभतेच पण व्यक्तीमत्व विकास व आध्यात्मिक शक्ती सुद्धा मिळते. धापवळीच्या जीवनात अनेकांना असंख्य आजारांचा सामना करावा लागत आहे. ह्दयविकाराने मृत्यु होण्याचे प्रमाण कधी नव्हे एवढे वाढले आहे. आपल्या देशात हृदयविकाराने दर 33 सेकंदाला 1 मृत्यू होत आहे. शिवाय आईवडिलांना असलेले ह्दयविकार, उच्च रक्तदाब, संधिवात, मधुमेह आदी विकार अनुवांशिकतेने मुलांनाही होण्याची शक्यता असते. यावर योगा हा एक चांगला उपाय आहे. प्राणायामामुळे अशा विकारांपासून दूर राहता येते.

आंतरराष्ट्रीय योग दिन मार्गदर्शक पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी 







No comments:

Post a Comment